‘पाणी जपून वापरा’, कालवा समिती बैठकीत अजित पवार यांचा पुणेकरांना सल्ला

‘पाणी जपून वापरा’, कालवा समिती बैठकीत अजित पवार यांचा पुणेकरांना सल्ला

पुण्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी शहरी तसंच ग्रामीण पाणी नियोजनाची माहिती घेतली.

काय म्हणाले अजित पवार बैठकीत?

अजित पवार यांनी ही बैठक आधीच व्हायला हवी होती, असं म्हटलं.

यावर्षी उन्हाळा बरा जाईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

पण पाणी जरी मुबलक असलं तर पाणी जपून वापरण्याचा सल्ला अजित पवार यांनी पुणेकरांना दिलाय.

भामा आसखेड बाधित 250 आणि 200 कोटी पीएमसी देणार आहे.

सर्व बारकाव्यांची माहिती असल्यामुळे शहर आणि ग्रामीण यांचा मध्य काढून हेक्टरी 15 लाख देण्याचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

यामुळं शहराला पाणी मिळेल. खडकवासला, बारामती आणि इतर ठिकाणी ताण पडणार नाही.

जायका प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निर्णय घेतला आहे. बंद पाईप लाईन ऐवजी बोगदा करुन पाणी देण्याची चर्चा झाली.

त्यामुळं अडीच टीएमसी पाणी वाचेल. हा खर्च सरकार आणि पालिका उचलेल.

उजनी धरणात मायनस जाणार नाही याची काळजी घेतली जाईल.

पवना प्रस्ताव काही पुढे आलेत, त्यावर निर्णय घेऊ.

हिंजवडी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

मी साधा सरळ आमदार म्हणून बैठक घेतली, निंबाळकर आणि गोरे यांना या समितीत कोणी घेतलं आणि काढलं हे मला माहीत नाही. तसंच मंत्रिमंडळ वाटप हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांचा आहे. आपल्याला त्याची माहिती नसल्याचं ते म्हणाले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version