अजित पवार पत्रकार परिषदेला अनुपस्थित

अजित पवार पत्रकार परिषदेला अनुपस्थित

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकारणात चांगलाच गदारोळ मजला होता. परंतु अजित पवारांनी शरद पवार दोन दिवसात निर्णय देतील असे सांगितले होते. ठरल्यानुसार ५ मे रोजी निवड समितीची बैठक झाली. त्यामध्ये समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला. दरम्यान शुक्रवारी ५.३० वाजता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अनुपस्थिबद्दल शरद पवारांनी थेट वक्तव्य केली आहेत.

शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी सर्वचजण त्यांना कळकळीची विनंती करीत होते. सर्वांच्या आग्रहाखातर पवारांनी हा निर्णय मागे घेतला असून त्यांनी हा निर्णय शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. परंतु अजित पवार पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्याचे दिसून आले. दरम्यान ‘पत्रकार परिषदेला कुणी आहे की नाही याचा वेगळा अर्थ नको’ असं थेट वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. तसेच, उत्तराधिकारी नेमण्याबाबबत भूमिकेत ‘उत्तराधिकारी असा काही मामला नसतो’ असेही ते म्हटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version