देशाला स्थिर आणि सशक्त सरकार हवं – अजित डोवाल

देशाला स्थिर आणि सशक्त सरकार हवं – अजित डोवाल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशाला पुढील 10 वर्षासाठी स्थिर आणि सशक्त सरकार हवं असल्याचं म्हटंल आहे.

जगात, भारताची राजकीय आणि आर्थिक रणनिती आखण्यासाठी हे गरजेचं असल्याचेही डोवाल यांनी स्पष्ट केले आहे.

सरदार पटेल मेमोरियल लेक्चरमध्ये बोलताना डोवाल यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका व्यक्त केली, डोवाल यांनी एकप्रकारे मोदी सरकारचे समर्थनच केले आहे.

काय म्हणाले अजित डोवाल?

  • सन 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल, मात्र त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, जे निर्णय लोकप्रिय नसतील, पण लोकांच्या हिताचे असतील.
  • त्यासाठी देशाला पुढील 10 वर्षे स्थिर सरकार हवं असल्याचं डोवाल यांनी म्हटंल आहे.
  • चुकीच्या घटना आणि फेक न्यूजच्या माध्यमातून देशात वातावरण खराब करण्यात येत आहे.
  • नक्षलींकडून हिंसात्मक आणि दंगल घडवण्याचे काम केले जात आहे.
  • चीनच्या अलिबाबा आणि इतर काही कंपन्या किती मोठ्या बनल्या आहेत.
  • त्याचप्रमाणे आपणही आपल्या देशातील कंपनींना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही डोवाल यांनी म्हटंल आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version