जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणनं आई आणि पत्नी काजोल यांच्यासह करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतलं. मंगळवारी सकाळी अजय देवगण, काजोल आणि अजय देवगण यांची आई हे तिघेही खास विमानाने कोल्हापूरमध्ये दाखल झाले, त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास दोघांनी देवीचं दर्शन घेतलं आणि देवीला अभिषेकही घातला.
देवगण कुटुंबाला पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती, त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. अजय देवगण गेल्या काही वर्षांत नियमितपणे अंबामातेच्या दर्शनाला येतो. त्याप्रमाणेच, यंदाही गुढीपाडव्यानंतर काजोल आणि अजय देवगण हे दोघेही करवीरनिवासनीच्या चरणी दाखल झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.