शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी निश्चित

शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी निश्चित

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४०हून अधिक आमदारांनी बंड पुकारला आहे. कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे त्यांना विधानसभेच्या शिवसेना गटनेतेपदावरून हटवण्यात आले होते. दरम्यान, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार अजय चौधरी यांना शिवसेनेच्या गटनेते पदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अजय चौधरी यांच्या निवडीची घोषणा होताच शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा उपाध्य ७ नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. यावेळी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.
अजय चौधरी हे मुंबईतील शिवडी मतदार संघातून विधानसभेत निवडून आले आहेत. तसेच ते शिवसेनेचे वरिष्ठ आणि विश्वासू नेता मानले जातात. शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून अजय चौधरी यांनी वीस वर्ष जबाबदारी सांभाळली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version