‘पद्मावत’ पाठोपाठ ‘अय्यारी’च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह ! संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप

‘पद्मावत’ पाठोपाठ ‘अय्यारी’च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह ! संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पद्मावत‘ सिनेमानंतर नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. हा चित्रपट दोन सैनिक अधिकार्‍यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाच्या काही सीन्सवर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. काही सीन्स बदलण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. ‘अय्यारी‘ हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.  वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसारशनिवारी संरक्षण मंत्रालयाने हा चित्रपट पाहिल्यनंतर त्यांनी अनेक सीन्सवर आक्षेप नोंदवला आहे.

अय्यारी हा सस्पेंस थ्रिलर चित्रपट आहे. वेगवेगळ्या वळणावर या चित्रपटात येणारे प्रसंग अंगावर शहारा आणणारे आहेत. सिद्धार्थ कपूर आणि मनोज वाजपेयी हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात सिद्धार्थची मनोजच्या शिष्याची भूमिका आहे.चित्रपटाचे प्रदर्शन अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्याने त्याता आयत्या वेळेस बदल करणं कठीण होणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version