वृत्तसंस्था, मुंबई
एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धामकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना दररोज 4GB डेटा मिळणार आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 3G/4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.
रिलायन्स जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेलने हा प्लॅन आणला आहे.
जिओच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी 90GB डेटा दिला जातो. तर एअरटेलच्या नव्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 3G/4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.
दरम्यान, एअरटेल ग्राहक या प्लॅनसाठी पात्र आहेत का, याची खात्री एअरटेलची वेबसाईट किंवा MyAirtel अॅपवर करावी लागेल. त्यानंतर 999 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर 28 दिवसांसाठी दररोज 4GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.