सरकार एअर इंडिया काढणार विक्रीला

सरकार एअर इंडिया काढणार विक्रीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया लवकरच विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिले. केंद्र सरकारच्या तीन वर्ष पूर्तिनिमित्त दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत जेटलींनी संकेत दिले.

 

योग्य गुंतवणूकदार मिळाल्यास सरकार एअर इंडियातून अंग काढून घेण्यास सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या देशातील हवाई वाहतूक बाजारपेठेतील 84 टक्के कार्यभाग खासगी विमान कंपन्या चालवतात, तर त्याच कंपन्या शंभर टक्के कार्यभाग का चालवू शकत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

अरुण जेटली यांच्या या वक्तव्यामुळे एअर इंडियासह हवाई वाहतूक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. सध्या एअर इंडियाचा बाजारपेठेतील वाटा अत्यंत कमी आहे. त्यातच कंपनीवर 50 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असल्याने सरकार ही कंपनी विकणार असल्याची चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version