एअर इंडियाच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाची एअर होस्टेस विमानातून खाली पडल्याची घटना घडली आहे.
एअर इंडियाचं विमान छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उभे असताना हा प्रकार घडला आहे.
एअर इंडियाच्या AI 864 या दिल्ली-मुंबई या विमानात हा अपघात झाला आहे, या अपघातात 53 वर्षाची एअर होस्टेस जखमी झाली आहे.
एअर इंडियाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणासाठी तयारी करताना सकाळी हा अपघात झाला आहे.
या प्रकारामुळे विमानानं नियोजीत वेळेपेक्षा 90 मिनीटे उशीराने उड्डाण घेतलं आहे.
हर्षा लोबो असं या एअर होस्टेसचं नाव असून विमानाचा दरवाजा उघडताना त्या खाली पडल्या, सध्या त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.