एआयबीनं मोदींच्या फोटोवर लावलं ‘डॉगी फिल्टर’

एआयबीनं मोदींच्या फोटोवर लावलं ‘डॉगी फिल्टर’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एआयबी या कॉमेडी ग्रुपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तिचा फोटो टि्वटरवर शेअर करून त्यांची खिल्ली उडवली. या फोटोसोबतच एआयबीने मोदींचा खरा फोटो ‘डॉगी फिल्टर’ करून शेअर केला. त्यामुळे नेटकरी प्रचंड संतापले.

 

हा देशातील जनतेच्या भावनांचा अवमान आहे, असं सांगत टि्वटर युजर्सनी एआयबीच्या या कृतीचा निषेध केला. टि्वटर युजर्सच्या संतापानंतर एआयबीने हे फोटो डिलिट केले. दरम्यान, एआयबी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्हे विभागाने याप्रकरणाचा तपास सुरू केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version