हृदयविकाराचा त्रास असलेल्या महिलेला कॉटवरुन रुग्णालयात नेले

हृदयविकाराचा त्रास असलेल्या महिलेला कॉटवरुन रुग्णालयात नेले

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

एकीकडे पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे संकल्पाकडून समृद्धीकडे बुलेट ट्रेनच्या माध्यमातून वाटचाल केली.

 

पण, दूसरीकडे अहमदनगरमधल्या एका गावात समृद्धी संकल्प तर सोडाच साधा रस्ताही पोहोचला नाही. आता जी दृश्य तुम्हाला दाखवणार आहोत त्यानं तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

 

सरकारनं रुग्णाला पोहोचवण्यासाठी 108 ही एम्ब्युलन्स सेवा सुरु केली. पण, ग्रामीण भागात आजही ही सेवा पोहोचलेली नाही. अहमदनगरच्या सामनगावमधलं हे दृश्य हृदयविकाराचा त्रास असलेल्या या महिलेला रुग्णालयात नेलं जात आहे.

 

पण, तेही एका कॉटवरुन गावाला शहरासोबत जोडणारा रस्ताच नसल्यानं महिलेला रुग्णालयापर्यंत तिरडीवर घेऊन जातात तसं घेऊन जावं लागत आहे.

 

प्रशासनाकडे रस्त्यासाठी अनेक निवदेनं देण्यात आली. पण, प्रशासन मात्र कुंभकर्णासारखं झोपलय. गावकऱ्यांना टाळाटाळ करणारी उत्तरं दिली जातात. त्यामुळे गावकरीही संतापले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version