Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेच्या जखमा आजही ओल्या…, ती भकास इमारत…, नातलगांचे कधीही न थांबणारे अश्रू…; अहमदाबाद विमान दुर्घटनेची वेदनादायी वर्षपूर्ती!

Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेच्या जखमा आजही ओल्या…, ती भकास इमारत…, नातलगांचे कधीही न थांबणारे अश्रू…; अहमदाबाद विमान दुर्घटनेची वेदनादायी वर्षपूर्ती!

अहमदाबाद : एक वर्षापूर्वी…याच दिवशी… भारताने सर्वात मोठा विमान अपघात अनुभवला होता. गेल्या वर्षी 12 जून रोजी अहमदाबाद येथे एका विमान दुर्घटनेत 12 क्रू मेंमर्बसह 242 प्रवाशांनी आपले प्राण गमावले होते. एअर इंडिया फ्लाइट 171 ही भारतातील अहमदाबाद विमानतळावरून युनायटेड किंग्डममधील लंडन गॅटविक विमानतळावर जाणारे एक नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाण करत होते. 12 जून 2025 रोजी विमानतळावरून हवेत झेप घेतल्यावर लगेचच अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात हे विमान कोसळले. त्यातील सर्व 242 प्रवासी जागीच ठार झाले. या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानात 230 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. याशिवाय जमिनीवरीलही डझनावारी लोक ठार झाल्याचा अंदाज आहे. बोईंग 787 विमान प्रकाराचा पहिलाच जीवघेणा अपघात आहे. पूर्ण विमान नष्ट झाल्याची ही पहिलीट घटना होती.

हेही वाचा : Central Railway: मुंबईकरांनो सावधान! आज आणि उद्या मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठे बदल

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि एर इंडियाच्या माहितीनुसार विमानात एकूण 242 लोक होते. ज्यात 230 प्रवासी (11 मुले आणि 2 अर्भके), 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या अपघातात मृत्यू पावले. या उड्डाणाचे वैमानिक सुमित सभरवाल तर सहवैमानिक क्लाईव्ह कुंदर यांनी केले होते. 

एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा जोर कमी झाल्याने ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर ते प्रचंड विमान कोसळले, ते आता केवळ एक सांगाड्यासारखी काँक्रीटची इमारत म्हणून उभे आहे. विमान इंधनाच्या तीव्र आगीमुळे भिंतींवर लागलेली काजळी स्पष्टपणे दिसत आहे. अपघाताचा तपास अजूनही सुरू असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. जरी एक प्राथमिक अहवाल आला असला तरी. जमिनीवरील लोकांसह 260 जणांचा बळी घेणाऱ्या या विमान अपघाताला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. वैमानिकाची कृती, तांत्रिक बिघाड आणि इंधन बंद करण्याच्या स्विचच्या सिद्धांतावरील प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version