जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 22 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे निंबोडी गावात शोककाळा पसरली आहे. शाळा सुटण्यासाठी अवघे 15 मिनिटे असताना पाचवीच्या वर्गाचे छत कोसळून ही दुर्दैवी घटना घडली.
एकूण 35 मुले वर्गात अडकली होती मात्र ग्रामस्थ आणि शिक्षकांनी मिळून जेसबीच्या साहाय्याने मुलांची सुटका केली.
जखमी मुलांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.
शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज असून जिल्हापरिषद प्रशासन फक्त कागदी घोडे मिरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.