माणुसकी मेली; मनोरुग्णाला कचाऱ्याच्या ट्रॅक्टरमधून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

माणुसकी मेली; मनोरुग्णाला कचाऱ्याच्या ट्रॅक्टरमधून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

राज्यात सध्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु आहे. मात्र, या स्वच्छतेच्या नादात राहाता नगरपरिषदेला माणुसकीचा विसर पडल्याचं पाहायला मिळालंय.

नगरपरिषदेच्या कचऱ्याच्या ट्रॅक्टरमधून एका मनोरुग्णाला नेतानाचा व्हिडिओ समोर आलाय.. या व्हिडिओमुळे एका जिवंत माणसाला कचऱ्याच्या गाडीतून घेऊन जाणे कितपत योग्य आह. असा सवाल आता उपस्थित होतोय.

या घटनेत आणखी लज्जास्पद बाब म्हणजे कचऱ्याच्या या गाडीतून या माणसाला कचरा डेपोत सोडल्याची माहिती समोर येतंय. हा संपूर्ण प्रकार पाहता नगरपरिषदेच्या या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जरा तरी माणुसकी आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version