Naresh Mhaske : खासदारांनंतर आता नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर? लवकरच ‘ऑपरेशन टायगर 3’; म्हस्केंचा दावा

शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली असून स्वतःचा वेगळा गट निर्माण केला आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना एकनाथ शिंदे यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठं भाकीत केलं आहे.
Naresh Mhaske : खासदारांनंतर आता नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर? लवकरच ‘ऑपरेशन टायगर 3’; म्हस्केंचा दावा

शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली असून स्वतःचा वेगळा गट निर्माण केला आहे. यात ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. दरम्यान आता हे खासदार शिवसेना शिंदे गटात विलीन होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

हेही वाचा- Ravi Rana On Shivsena UBT Operation Tiger : “ठाकरेंचे 2 खासदार माझ्या संपर्कात” रवी राणा यांचा खळबळजनक दावा

यामुळे ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदेंवर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना एकनाथ शिंदे यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठं भाकीत केलं आहे. 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हे सर्व खासदार आपली भूमिका मांडू शकतात. तसेच ठाकरेंचे मुंबई महापालिकेतील नगरसेवक देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे नरेश म्हस्के यांनी सूतोवाच केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला भगदाड पडण्याची शक्यता आहे.

यावेळी नरेश म्हस्के म्हणाले की, “संजय राऊत सारखी व्यक्ती 15 करोडची भाषा करत आहेत, तीच व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष विनीलीकरण करण्याची भाषा करत आहेत. मग त्यांनी किती करोड रुपये घेतले आहेत? हे त्यांनी सांगावे. ती लोकं आमच्या पक्षात येणार की नाही माहिती नाही. पण ही लोकं सोडून का जात आहेत? याचा विचार केला का कधी? राजा कधी बाहेर आला का? मुंबईसोडून बाहेर कधी गेलात का? मातोश्री सोडून कुठे गेलात का? कधी कोणत्या शिवसैनिकाला मदत केली का? उभाठा गटाने आधी आत्मपरीक्षण करावं, आणि मग शिंदे साहेबांना दोष द्यावा, ते खासदार आमच्या येतील, नाही येतील माहिती नाहीत. पण साधा कार्यकर्ता देखील तुमच्याकडे राहत नाही. 65 नगरसेवक तुमचे निवडून आले आहेत, पण ते देखील तुमच्याकडे राहतील का? हे बघत रहा आता.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version