Siddhesh Kadam On Amit Thackeray : "मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर…" भाजप-मनसे वादात शिंदेसेनेची उडी; अमित ठाकरेंना शिंदेसेनेचा थेट इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो मनसे कार्यकर्त्यांनी हटवल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. सिद्धेश कदम यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली.
Siddhesh Kadam On Amit Thackeray : "मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर…" भाजप-मनसे वादात शिंदेसेनेची उडी; अमित ठाकरेंना शिंदेसेनेचा थेट इशारा

मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवल्याच्या घटनेवरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अमित ठाकरेंनी, मुख्याध्यापकांच्या कार्यालयात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा तिथून काढायला लावला.

या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे मनसे कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो मनसे कार्यकर्त्यांनी हटवल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. 

मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात प्लास्टिक रिसायकलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धेश कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. “अमित ठाकरे यांचे हे वर्तन म्हणजे बालिशपणा आहे. कुठेही आक्रमकता दाखवायची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे विसरायचे,  जगाच्या नकाशावर मोदी साहेबांचा वर्चस्व आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. तुम्ही भारतात कशाला राहता?” असा टोला सिद्धेश कदम यांनी लगावला.

कदम यांच्या या जहाल वक्तव्यामुळे भाजप-मनसे वादाला आता शिंदेसेनेच्या आक्रमक भूमिकेची फोडणी मिळाली आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता तीन पक्षांमध्ये रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सिद्धेश कदम यांच्या “पाकिस्तानात जा” या वक्तव्यावरून भाजप, मनसे आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version