मध्यप्रदेशानंतर गुजरामध्येही रात्रीच्या संचारबंदीचे आदेश

मध्यप्रदेशानंतर गुजरामध्येही रात्रीच्या संचारबंदीचे आदेश

देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता मध्यप्रदेशानंतर गुजरातमध्येही रात्रीच्या संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरातमध्येही रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी असणार आहे.

देशात कोरोनानंतर आता ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढलं आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर गुजरातमध्येही ओमायक्रॉन बाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून आंध्रप्रदेशनंतर आता गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गुजरातमधील आठ शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. अहमदाबाद, बडोदा, राजकोट, सुरत, जामनगर, गांधीनगर, जुनागडमध्ये रात्रीची संचारबंदी असणार आहे. गुजरातमधील या आठ शहरांमध्ये रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३५८वर पोहचली आहे. तर देशातील १७ राज्यांमध्ये ओमायक्रॉन रुग्णांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली असून कोरोना नियमांचे पालन आणि काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version