आयफोन खरेदीची वाट बघत होतात?.. आता तर तो महागला

आयफोन खरेदीची वाट बघत होतात?.. आता तर तो महागला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

2018-19च अर्थसंकल्प आल्यनंतर स्मार्टफोनवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आला आहेत. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या या घोषणेने आयफोनच्या किमतींमध्ये बराच (वाढता) फरक पडला आहे.

अर्थसंकल्प जाहीर झ्लायानंतर तब्बल चार दिवसांनी अॅपलने आपल्या आयफोनच्या किमतीत 3 ते 6 टक्क्यांची वाढ केली आहे. पण ग्राबकांना दिलासा म्हणून भारतात तयार होणाऱ्या आयफोन SEच्या किंमतीत काहीही फरक पडलेला नाही.

येत्या काळात आयफोन आणखी महाग होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. शक्यता आशी ही आहे की, एप्रिल महिन्यापासून नवी कस्टम ड्युटी लागू केली जेईल. त्यामुळे आणखीनच आयफोनच्या किमतीत वाढ होईल.

अॅपल आयफोनच्या नव्या किमतींची एक झलक

आधी आयफोन 6 (32 जीबी)ची किंमत 30,780 होती त्याची आताची किंमत 31,900 रुपये आहे. आधीची आयफोन 6S (16 जीबी) किंमत 41,550 होती त्याची आताची किंमत 42,900 रुपये आहे. आयफोन 6S प्लस (32 जीबी) सध्याची किंमत 61,450 रुपये आहे. तर, आयफोन 7 (32 जीबी)ची आधीची किंमत 50,810 होती तर आताची त्याची किंमत 52,370 रुपये आहे.

आयफोन 7 प्लस (32 जीबी)या आयफोनची आधीची किंमत 61,060 वरूण 62,840 रुपयांवर पोहचली आहे. तर, आयफोन 8 (64 जीबी) आधीची किंमत 66,120 वरून आता तब्बल 67,940 रुपयांचा पल्ला गाठला आहे. आयफोन 8 प्लस (64 जीबी)ची आधीची किंमत 75,450 होती तर आता त्याची किंमत 77,560 रुपये आहे. आयफोन X (64 जीबी)ची आधीची किंमत 92,430 होती सध्याची किंमत 95,390 रुपये आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version