मिशन अॅडमिशन ! अर्ज भरण्यासाठी मंगळवार अखेरचा दिवस

मिशन अॅडमिशन !  अर्ज भरण्यासाठी मंगळवार अखेरचा दिवस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज पूर्ण भरण्यासाठी मंगळवारी अखेरचा दिवस आहे.

 

त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक विभागानं केले आहे.

 

मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाकडून मुंबईत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ उडाल्याने अनेकांनी त्यावर टीका केली.

 

मात्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्तक्षेपानंतर गेल्या तीन दिवसांपासून ही प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

 

आतापर्यंत दोन लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदाही अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version