जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.
विद्यापीठातील भोंगळ कारभार आणि शिक्षण व्यवस्था याविषयावर भेट राज्यपालांशी चर्चा केली.
ऑनलाईन ॲडमिशन होत असताना ऑनलाईन असेसेमेंट सिस्टीम भक्कम नाही असं म्हणत विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार असणाऱे शिक्षणमंत्री तसेच
कुलगुरु या दोघांचे राजीनामे घ्या अशी मागणीही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केली.
ऑनलाइन असेसमेंट चे टेंडर कुणाला, कोणत्या आधारावर दिले, यामध्ये संशय येतो, त्यामुळे या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी अशीही मागणी आदित्य ठाकरेंनी
राज्यपालांकडे केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.