आदित्य ठाकरेंनी चालवली सायकल

आदित्य ठाकरेंनी चालवली सायकल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

0युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी सायकल चालवण्याचा आनंद लुटला आहे.

वाहनांची गर्दी आणि वेगापुढे मागे पडणा-या सायकलींसाठी एक रविवार महापालिकेने राखून ठेवला आहे. एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस ही 11.5 किलोमीटरची स्वतंत्र मार्गिका यासाठी तयार करण्यात आलीय.

आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सायकलसाठी स्वतंत्र मार्गिकेचा शुभारंभ करण्यात आलाय.

मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूककोंडी, पार्किंगबरोबरच प्रदूषणही वाढविलेय.

त्यामुळे सायकलप्रेमींना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतलाय. 10 डिसेंबरपासून नागरिकांसाठी 11.5  कि.मी. ही मार्गिका विनाशुल्क खुली होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version