अदिती पुन्हा झळकणार मालिकेत

अदिती पुन्हा झळकणार मालिकेत

मुंबई,२६ एप्रिल,प्रतिनिधी:छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नवा गडी नवं राज्य’ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विषयाच्या वेगळेपणाने या मालिकेने स्वतःचे हे स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. मालिकेतील पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर, साईशा भोईर या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ही मालिका अत्यंत रोमांचक वळणावर आहे. आता मालिकेत आणखीन एक नवीन वळण येणार असून नव्या पात्राचं पदार्पण होणार आहे.

अभिनेत्री अदिती सारंगधर ही लवकरच ‘नवा गडी नवा राज्य’ या मालिकेत दिसणार आहे. अर्थात मालिकेत ती सकारात्मक की नकारात्मक यापैकी कोणती भूमिका साकारणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. ‘वादळवाट’, ‘लक्ष्य’, ‘ह. म. बने…’ यासारख्या मालिका, काही नाटकं-चित्रपटातून अभिनेत्री अदिती सारंगधरने विविध भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाने तिने आपण साकारलेल्या भूमिकांना न्याय दिलेला आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मालविका हे नकारात्मक पात्र साकारलं होतं तेव्हा तिच्या या भूमिकेचं बरंच कौतुकही झालं. या मालिकेनंतर अदितीने काही काळ ब्रेक घेतला होता.आता पुन्हा नव्या भूमिकेत ती प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज झाली आहे. अदितीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version