अधिक महिन्यात विठ्ठलचरणी भरघोस दान

अधिक महिन्यात विठ्ठलचरणी भरघोस दान

पंढरपूर, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अधिक महिन्यात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस तब्बल सात कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले. तीन वर्षापूर्वी २०१८ मध्ये अधिक महिन्यात दोन कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये उत्पन्न मिळाले होते.

त्या तुलनेत यंदाच्या अधिक महिन्यात तब्बल चार कोटी ८६ लाख ९१ हजार ११३ रुपये जास्त उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यंदादेखील अधिक महिन्यात ६ लाख ३९ हजार ९१७ भाविकांनी पद्स्पर्शाचा तर पाच लाख भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला.

अधिक महिन्यात विठुरायाच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात सोने चांदीच्या वस्तू अर्पण केल्या जातात. यंदाही २४ लाख ९८ हजार ८९० रुपये किमतीचे सोने आणि ८ लाख १८ हजार ८५९ रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू भाविकांकडून अर्पण करण्यात आल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version