कोरोना मंदीतून जग सावरत असताना भडकलेले इंधनदर आणि महागाईचा चढता आलेख यात सोमवारपासून केंद्र सरकारने वाढवलेल्या वस्तू आणि सेवाकराची भर पडणार आहे.वेष्टनातील अत्यावश्यक अन्नपदार्थ ते खासगी रुग्णालयांतील उपचार अशा अनेक महत्त्वाच्या बाबी महाग वस्तूंच्या यादीत समाविष्ट होत आहेत.
पीठ, पनीर, दही यांसारखे वेष्टनांकित आणि लेबल लावलेले खाद्यपदार्थ आतापर्यंत ‘जीएसटी’मुक्त होते, परंतु सोमवारपासून त्यांवर पाच टक्के जीएसटी भरावा लागेल. त्याचबरोबर रुग्णालयातील पाच हजारांहून अधिक भाडे असलेल्या खोलीसाठीही पाच टक्के जीएसटी भार रुग्णांवर पडणार आहे. म्हणजे खासगी रुग्णालयांतील उपचारही महाग होणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पॅकबंद आणि लेबल केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार यांसारख्या उत्पादनांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला. तर गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यावर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बदल आजपासून प्रभावी झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.