सोनाली कुलकर्णी अडकली लग्नबंधनात

सोनाली कुलकर्णी अडकली लग्नबंधनात

कोरोना काळात अनेकांनी साध्या पद्धतीने लग्न केली आहे. आता यात सेलिब्रिटी सुद्धा सुटले नाही आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला होता. आता सोनाली ही विवाहबंधनात अडवली आहे. सोनालीचा विवाह सोहळा दुबईत साध्या पद्धतीने पार पडला हा विवाह ७ मे रोजी दुबईत झाला. सोनालीने तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला. दोन दिवसांत सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांमध्ये चार लोकांच्या साक्षीने मंदिरात लग्न करण्यात आलं आहे. कोव्हिड निर्बंधांमुळे सोनालीने तिचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने केला आहे. वरमाळा, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून लग्नाच्या मान्यतेसाठी मंदिराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी तिने केल्या. आणि मॅरेज सर्टिफिकेटवर स्वाक्षरी केली’ अशी पोस्ट सोनालीने लग्नचे फोटो शेअर करताना लिहिली. सोनालीच्या परिवाराने या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचंही तिने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे. सोनालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्याच्या घडीला सोनाली आणि कुणालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version