अभिनेता संकेत लग्नबंधनात अडकणार

अभिनेता संकेत लग्नबंधनात अडकणार

आपल्या आवडत्या कलाकाराच्या खाजगी आयुष्यात काय सुरुआहे त्याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. तर असेच छोट्या पडद्यावरील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. संकेत सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी या मालिकेत राघवाच्या भूमिकेत दिसतो. नुकतेच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती दिली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तो लवकरच आपली गर्लफ्रेंड सुपर्णा श्याम हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. संकेत आणि सुपर्णा गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत काम करत असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी साखरपुडा केला होता.’दुहेरी’ या मराठी मालिकेच्या सेटवर संकेत आणि सुपर्णा यांची पहिली भेट झाली होती. मालिकेच्या निमित्त्ताने एकत्रित काम केल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१६ साली झालेली ओळख ते २०२३ मध्ये आयुष्याचे जोडीदार होईपर्यंतचा हा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे .

सध्या या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु आहे. संकेतने नुकतेच सोशल मीडियावर लग्नाची तारीख जाहीर केली आहे. येत्या शनिवारी म्हणजेच २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संकेत आणि सुपर्णा लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांचा लग्नसोहळा पुण्यात मोठ्या थाटातमाटात पार पडणार आहे. या सोहळ्यात संकेत आणि सुपर्ण त्यांच्या कुटुंबियांसह कला सृष्टीतील त्याचे सहकलाकार मंडळी सुद्धा आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version