‘त्या’ मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार!

‘त्या’ मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार!

18 सप्टेंबर रोजी ‘लालबागचा राजा’च्या मंडळाच्या कार्यकत्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडीयो समोर आला. दरवेळीच हे कार्यकर्ते भाविकांशी मुजोरीने वागताना दिसून आले आहेत. यावेळी चक्क त्यांनी पोलिसांच्या खाकी वर्दीचीही तमा बाळगली नाही. त्यांचा हाच राडा कॅमेरात कैद झाल्यावर आता या संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे.

 

गणपती विसर्जनानंतर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 18 सप्टेंबर रोजी मंगळवार निमित्त भाविकांची लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. यावेळी गर्दीत पोलिसांचा धक्का मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी याला लागला आणि कोणताही मुलाहिजा न राखता थेट कार्यकर्ते थेट पोलिसावर धावून गेले. या प्रकारामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र भाविकच नव्हे, तर पोलिसांनाही न जुमानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीवर नियंत्रण कसं ठेवणार हा प्रश्न निर्माण झालाय. मात्र आता संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळाल्याने काही प्रमाणात या मुजोर कार्यकर्त्यांना वेसण घातलं जाण्याची शक्यता आहे.

 

  

 

 

 

 

  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version