त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी कारवाईला सुरुवात

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी कारवाईला सुरुवात

नाशिक, १८ मे २०२३, प्रतिनिधी : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किरकोळ कारणावरून दोन गटात जोरदार राडा झाला होता. आता या प्रकरणी कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. पोलीस संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तसेच आतापर्यंत चार उरूस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एसआयटी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात किरकोळ कारणावरून दोन गटात मोठा वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. याशिवाय पोलिसांनी दोन्ही गटांची बैठक बोलावून लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बुधवारी काही हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिराचं शुद्धिकरण करत महाआरती केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणी कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version