नागपुरात ईडीची कारवाई, एम्प्रेस मॉल ईडीच्या ताब्यात

नागपुरात ईडीची कारवाई, एम्प्रेस मॉल ईडीच्या ताब्यात

  अंमलबजावणी संचालनालयाने नागपुरात मोठी कारवाई केली आहे. बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी नागपुरातील ४८३ कोटी रुपयांचा एम्प्रेस मॉल ताब्यात घेतला असून कारवाई सुरू केली आहे.

  तायल ग्रुप ऑफ कंपनीजच्या विरोधात बँक फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रातील नागपुरातील ४८३ कोटी रुपयांचा एम्प्रेस मॉल ताब्यात घेतला आहे. या एम्प्रेस मॉलने ७२५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

 एम्प्रेस मॉलची मालकी मुंबईतील केएसएल इंडस्ट्रीजची आहे. या केएसएल इंडस्ट्रीजचे प्रमुख प्रवीणकुमार तायल हे आहेत. केएसएल इंडस्ट्रीजने २०१५मध्ये बँक ऑफ इंडिया आणि आंध्रा बँकेकडून ५२५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच युको बँकेकडूनही २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. यापूर्वी मनपाने मालमत्ता थकविल्याप्रकरणी एम्प्रेस मॉलवर कारवाई केली होती. आता बँक फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रातील नागपुरातील 483 कोटी रुपयांचा एम्प्रेस मॉल ताब्यात घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version