अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी ६ जणांवर कारवाई

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी ६ जणांवर कारवाई

  अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणाबाबत राज्य सरकारने कारवाई केली आहे. या रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणी ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित तर दोन जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटकरत दिली आहे.

या अधिकाऱ्यांवर कारवाई?

१. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित

२. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित

३. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित

४. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित

५. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त

६. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त

  अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला तर काही रुग्ण जळल्याची माहिती समोर आली. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वजण ५० ते ८५ या वयोगटातील होते. या जिल्हा रुग्णालयाच्या अग्नीतांडवातील मृतांच्या कुटुंबियांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अग्नीतांडवाबद्दल शोकभावना व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आणि अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणाबाबत राज्य सरकारने कारवाई केली आहे. या रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणी ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version