जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आचार्य अत्रे यांच्या कन्या शिऱिष पै यांचे मुंबईत त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ लेखिका, पत्रकार शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला होता.
कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी लिखाण केले आहे. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.