अंधश्रद्धेतून महिलेवर भुताटकीचा आरोप

अंधश्रद्धेतून महिलेवर भुताटकीचा आरोप

महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाडा येथील येथील एका हळदीच्या कार्यक्रमात आलेल्या आदिवासी महिलेला चेटकीण ठरवले आहे. तसेच तीला इतर महिलांमधून मंडपाच्या मध्यभागी आणत तीच्या अंगावर भंडारा टाकण्यात आला. तसेच दोन तरुणांनी महिलेला चेटकीण ठरवत तिच्यावर भुताटकीचा आरोप केला. या घटनेनंतर पीडित महिलेने वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version