पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात

पुणे, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पुणे मुंबई द्रुतमार्गावर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणारा एक कंटेनर पलटला असून या अपघातात कंटेनर ने पाच छोट्या गाड्यांना धडक दिली आहे. यामध्ये कार मधील एक चालक आणि एक महिला अशा दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये इतर काही जण देखील जखमी झाले आहेत.

कंटेनर पुण्याहून मुंबईकडे जात असताना लोणावळ्याच्या हद्दीत कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर दुसऱ्या लेनवर जाऊन पलटला. यादरम्यान कंटेनर ने सुझुकी डिजायर आणि इतर काही वाहनांना धडक दिली. सुझुकी डिझायर या गाडी मधील चालक आणि एक महिला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर इतर अन्य दोन महिला जखमी झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version