अश्लील रॅप साँगविरोधात अभाविप आक्रमक

अश्लील रॅप साँगविरोधात अभाविप आक्रमक

अश्लील रॅप साँग शूट प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. रॅपरवर कारवाई करण्याची मागणी करत अभाविपने आज विद्यापीठात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठकही उधळून लावली. यावेळी विद्यापीठातील काही वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.

शुभम जाधव नावाच्या तरुणाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक अश्लील रॅप साँग शूट केलं होतं. या रॅप साँगवरुन राज्यात चांगलाच गोंधळ झाला होता. या रॅपरवर कारवाई करण्याची मागणीही होत होती. अशातच आता अभाविपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अभाविपने आज विद्यापीठात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रॅपर शुभम जाधववर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विद्यापीठात सुरू असलेली वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठकही त्यांनी उधळून लावली.

दरम्यान, या रॅप साँग शुट प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात शुभमवर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच आता विद्यापीठात रॅप साँग शुटींगला कुणी परवानगी दिली? त्याच्यांवरही कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात नेमकं दोष कुणाचा? हे विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतरच समोर येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version