जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘आत्मक्लेश’ आंदोलनावरून खोत-शेट्टी यांच्यातील शीतयुद्ध एकदा समोर आलं. शेट्टींची इच्छा असेल तर आंदोलनापासून दूर राहणार असल्याचा आक्रमक पवित्रा सदाभाऊ खोत यांनी घेतला.
तसंच मी मळलेल्या वाटेवरून चालणारा नेता मी नसून मी स्वत:ची वाट निर्माण करणारा नेता आहे असं प्रत्युत्तर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींच्या उत्तराला दिलं.
खासदारांनी आपल्या बगलबच्चांना लगाम घालाव अन्यथा त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा पवित्रा देखील खोत यांनी घेतला. त्यामुळे खोत आणि शेट्टी यांच्यातील अतंर्गतवाद पुन्हा एकदा समोर आला.
दरम्यान माणसाला मोह होणं हे साहाजिक असून आमचा हनुमान हा हनुमानच असल्याचा ठाम विश्वास आहे असं राजू शेट्टी यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या न्यूजरूममध्ये रामायणाचे दाखले देत दोघांमधील वादाच्या ठिणगीला सूचक टोला लगावला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.