गुजरातमधील वडोदरा येथे असलेल्या समा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या 21व्या WKI इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये महाराष्ट्राची उदयोन्मुख कराटेपटू आराध्या पांडेय हिने दमदार कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल केले. वाडो-काई इंडिया (WKI) संघटनेतर्फे आयोजित ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा अनेक देशांतील खेळाडूंना एकाच मंचावर आणते आणि याच मंचावर महाराष्ट्रातील आराध्याने आपली चमक दाखवली.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेत दोन प्रमुख गटांमध्ये सामने झाले. काता (Kata) ज्यामध्ये तंत्र, संतुलन आणि नियंत्रण यावर विजेता ठरतो आणि कुमिते (Kumite) ज्यामध्ये प्रत्यक्ष सामने होऊन विजेता निवडला जातो. या दोन्ही प्रकारांमध्ये आराध्याने अप्रतिम कौशल्य दाखवले.
कुमितेमध्ये आराध्याने नेपालच्या खेळाडू ला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले, तर कातामध्ये श्रीलंकेच्या खेळाडू ला मात देत कांस्य पदक आपल्या नावे केले. तिचा आत्मविश्वास, वेग, तंत्र आणि संतुलन पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.फॉरमोस्ट फायटर अकॅडमीमधून निवड झालेल्या इतर विद्यार्थ्यांनीही भारताचे प्रतिनिधित्व करत विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून पदके जिंकली आहेत.
या खेळाडूंची ही कामगिरी केवळ एक विजय नाही, तर मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे शक्य आहे याचा पुरावा आहे. आराध्य च्या प्रशिक्षक पुरु रावल आपल्या शिष्यााच्या यशाने अत्यंत आनंदी असून आराध्या भविष्यात महाराष्ट्राला आणि देशाला अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय पदकांची भेट देईल असा विश्वास व्यक्त करतात.
आपली ही कामगिरी देशाला समर्पित करत आराध्याने सांगितले की, ती पुढे आणखी मेहनत करून महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव जागतिक मंचावर अधिक उज्वल करणार आहे. आराध्या पांडेय आज महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणादायी नाव ठरली आहे.
वडोदरा येथे झालेल्या WKI इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत महाराष्ट्राची आराध्या पांडेय हिने कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये कांस्य पदक जिंकत भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला. मी तिचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राची लेक म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या भविष्यातील… pic.twitter.com/cbH9TtIh2U — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 1, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.