सर्वोच्च न्यायालयाचा सहारा समूहाला दणका; अँबी व्हँलीचा लिलाव होणारच

सर्वोच्च न्यायालयाचा सहारा समूहाला दणका; अँबी व्हँलीचा लिलाव होणारच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला दणका दिला आहे. 10 आणि 11 ऑक्टोबरला अँबी व्हँलीचा लिलाव करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

 

सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी न्यायालयाने सांगितलेली 1500 कोटी रुपयांची रक्कम  जमा न केल्याने न्यायालयाने लिलावाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

त्यामुळे  मुंबईमध्ये अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणार आहे. या लिलाव प्रक्रियेत अधिक बोली लावणाऱ्या तीन जणांना 17 ऑक्टोबर रोजी ई-मेलद्वारे माहिती देण्यात येईल. त्यानंंतर सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला 16 जानेवारी 2018 पर्यंत पूर्ण रक्कम जमा करावी लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version