#AajSeTumharaNaam चा सर्वत्र धुमाकूळ!

#AajSeTumharaNaam चा सर्वत्र धुमाकूळ!

‘अलाहबाद’ स्टेशनचं नाव बदलून ‘प्रयागराज’ केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकजणांना हा निर्णय पटलेला आहे, तर अनेकांना हा निर्णय आवडलेला नाही. या सर्व प्रकारात नेटिझन्सनी मात्र Memes आणि troll करत धमाल उडवून दिली आहे.

योगी आदित्यनाथ हे प्रत्येक अहिंदू व्यक्तीचं नाव बदलून त्या नावाशी साधर्म्य असणारं हिंदू नाव ठेवत असल्याचं वेगवेगळ्या memes मधून पाहायला मिळतंय. ‘आमिर खान’चं नाव योगी आदित्यनाथ यांनी ‘अमर खन्ना’ ठेवलं आहे, तर ‘माय नेम इज खान’चं नाव बदलून ‘माय नेम इज खंडेलवाल’ असं योगी आदित्यनाथ ठेवत असताना memes मधून सादर केलं आहे. एवढंच नव्हे तर खुद्द ‘योगी आदित्यनाथ’ यांनीही आपलं नाव ‘अजय सिंग बिश्त’चं बदलून ‘योगी आदित्यनाथ’ कसं ठेवलं हे सुद्धा या memes मध्ये दाखवलंय…

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version