Pune Shocker: पुणे हादरलं! बुधवार पेठ परिसरात नवव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने स्वत:ला संपवलं

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.<br/>
Pune Shocker: पुणे हादरलं! बुधवार पेठ परिसरात नवव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने स्वत:ला संपवलं

Pune Shocker: पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीने ती राहात असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून स्वत:ला संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – Nashik Crime News : पुन्हा एका सुनेचा केला जीव; सासू आणि नणंदेवर नवविवाहीतेचा छळ केल्याचा आरोप

प्राथमिक माहितीनुसार, ही तरुणी इमारतीतच राहात होती. सायंकाळच्या सुमारास अचानक ती खाली पडल्याचे आसपासच्या नागरिकांच्या लक्षात आले. तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना संपर्क साधला. अल्पावधीतच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आवश्यक पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली. तरुणीचा मृतदेह पुढील तपासासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा – Crime News: घरात मिळाले दोन मृतदेह; भिंतीवर लिपलस्टिकने लिहिला शेवटचा संदेश

तरुणीच्या या टोकाच्या भूमिकेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणीच्या कुटुंबीयांकडून पोलीस चौकशी करत असून, शेजाऱ्यांचेही जबाब घेतले जात आहेत. तथापी, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याने तरुणीने नेमकी कोणत्या कारणाने हे टोकाचे पाऊल उचलले? याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मानसिक ताण, कौटुंबिक मतभेद किंवा आणखी कुठले कारण होते का, हे समजण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version