पोलिस दलात २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि सध्या हदगाव तालुक्यातील मनाठा पोलिस ठाण्यात असलेल्या वर्षा पवार यांना चार वर्षापासून अचानक शरिरात बदल घडून येत असल्याने आणि पुरुष असल्याचे भावना वाटत आहे. त्यामुळे वर्षा पवार यांनी कुटूंबाची सहमती घेऊन लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. वर्षा पवार यांनी जिल्हा नियोजन पोलिस अधिक्षक, डीजी आॅफिस अर्ज केला तेथून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने वर्षा यांना देखील मुख्यमंत्री आणि मॅट कडे जाण्याचा सल्ला दिला आहे.
वर्षा पवार यांना लिंग परिवर्तन करायचे आहे. मात्र, शासकीय सेवेत असलेल्या वर्षा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात शासनाचे धोरण स्पष्ट नसल्याने अडचणी येत आहेत. दरम्यान, वर्षा पवार यांना वर्ष भरा पुर्वी लिंग परिवर्तन करणाऱ्या डॉ. सान्वी जेठवानी यांनी साथ दिली आहे. यापुढे जेठवाणी यांनी वर्षा यांना पाठिंबा देत सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
समाजात वावरत असताना लिंग परिवर्तन करण्याचा प्रसंग हा वर्षा पवार यांच्या साठी कठीण असला तरी आज समाजात आपल्या शारिरीक बदला बाबत समाजात न सांगता कुंठित बसणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वर्षा पवार यांनी लिंग परिवर्तन करुन प्रवाहात राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या लढ्याला कधी यश येईल हे पाहणे महत्वाचे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.