Radhika Merchant Speak Marathi : "मी स्वदेशमध्ये हे घालेन" अन् ‘त्या’ कृतीने अंबानींच्या सूनेने महाराष्ट्रातील जनतेच मन जिंकलं; Viral Video पाहिलात का?

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हिंदी-मराठी असा भाषिकवाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमिवर राधिका मर्चंटची एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.
Radhika Merchant Speak Marathi : "मी स्वदेशमध्ये हे घालेन" अन् ‘त्या’ कृतीने अंबानींच्या सूनेने महाराष्ट्रातील जनतेच मन जिंकलं; Viral Video पाहिलात का?

5 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत स्वदेश फ्लॅगशिप स्टोअरचे उद्घाटन भारतीय कापडाच्या एका भव्य उत्सवात रूपांतरित झाले. मुंबईतील 'स्वदेश'च्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये भारतीय कलाकार आणि कारागिरांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या काही दिवसांपुर्वी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटची एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हिंदी-मराठी असा भाषिकवाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

खाण्यावरून, राहणीमानावरून इतकचं नव्हे तर प्रवासादरम्यान हे वाद पेटल्याचं समोर आलं. या वादाचे पडसाद राजकीयवर्तूळात देखील पडत होते. अशातच राधिका मर्चंट यांच्या एका कृतीमुळे राज्यभरात त्यांचे कौतुक केले जात आहे. मुंबईतील 'स्वदेश'चे फ्लॅगशिप स्टोअरच्या कार्यक्रमासाठी राधिका मर्चंट एका शोरुममध्ये गेल्या होत्या. तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीशी त्यांनी मराठीमध्ये संवाद साधला. त्या स्वदेश कार्यक्रमासाठी काही कपडे सिलेक्ट करत असताना त्यांना एक जॅकेट दिसले.

हेही वाचा- Bayilone Ballipalike Trending Song : इंस्टा, शॉर्ट्स, रिल्सपासून अगदी लग्नात नवरा-नवरीसुद्धा या गाण्यावर थिरकले; काय आहे खास 'या' गाण्यात…

त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की, 'हे घेऊन या, तुम्ही मुंबईला येणार नसाल तर आम्हाला सांगा… मी स्वदेशमध्ये हे पेरुन येईन…' त्यांनी केलेल्या या समंजस संवादामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून खुप प्रेम आणि आदर मिळत आहे.  सुंदर हाताने विणलेल्या भारतीय जॅकेटसाठी राधिका अंबानीने मराठीत केलेली मनापासून केलेली प्रशंसा आता ऑनलाइन लोकांची मने जिंकत आहे. तिचे साधेपणा आणि भारतीय कारागिरांना दिलेला पाठिंबा या गोष्टींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

https://twitter.com/mnsvideos/status/1997007764548407404

एवढच नव्हे तर तिनी भारतीय विणकामाच्या कारागिरी आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला आहे. राधिका मर्चंटची ही व्हिडिओ नुकतीच व्हायरल झाली आहे, मात्र तिला लोकांच खुप प्रेम मिळ आहे. चाहते तिच्या या मराठी भाषेतील कौशल्याचे कौतुक करत आहेत, विशेषतः तिने महाराष्ट्राशी आणि मराठी भाषेशी जोडलेले प्रेम दाखवल्याबद्दल तिच मोठ्या प्रमाणात कौतुक केल जात आहे. 

नीता अंबानी यांनी मुंबईतील 'स्वदेश'चे फ्लॅगशिप स्टोअर सुरू केले आहे. हे स्टोअर भारतीय हस्तकला, ​​कला, दागिने आणि फॅशनला प्रोत्साहन देणारे आहे. याचपार्श्वभूमिवर नीता अंबानी यांनी इरोसमधील स्वदेशच्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये भारतातील कलाकार आणि कारागिरांच्या सन्मानार्थ एक खास उत्सव आयोजित केला होता. या प्रसंगी त्यांनी स्वदेशमधील मोरपंखी निळ्या रंगाची बनारसी साडी परिधान केली होती.

हेही वाचा- Prajakta Gaikwad Reception Entry : नंदीवरील एन्ट्रीवरून प्राजक्ता अडकली ट्रोलिंगच्या कचाट्यात! प्रसिद्ध ज्योतिषाने स्पष्ट केलं लॉजिक

आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनीही त्यांच्या स्टायलिश सर्वोत्तम पोशाखात या समारंभाला हजेरी लावली. त्यांच्या व्यतिरिक्त, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, अनन्या पांडे, करिश्मा कपूर, भूमी पेडणेकर, जेनेलिया देशमुख, सोनम कपूर आणि इतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवली होती. सेलिब्रिटी आणि डिझायनर्सनी प्रदर्शनात कलाकुसरीचा आनंद घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version