मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील गर्दी आणि त्यातून होणारे वाद नवे नाहीत. मात्र, सध्या सोशल मीडियावर मुंबईतील लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या तुफान हाणामारीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रात्री उशिरा धावत्या लोकल ट्रेनच्या डब्यामध्ये एक रेल्वे प्रवासी आणि तृतीयपंथीय यांच्यामध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली आहे. रेल्वे प्रवाशी असलेल्या डब्यात काही तृतीयपंथीय चढले होते.
काही कारणावरुन एक प्रवासी आणि दोन तृतीयपंथीयांमध्ये बाचाबाची झाली. अखेर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही तृतीयपंथीयांनी प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी हाणामारी करण्यास सुरुवात केली. शिवाय शिवीगाळ ही केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मात्र लोकलमध्ये झालेल्या या फ्री-स्टाईल हाणामारीचे नेमके कारण काय आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही. यावेळी चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये आणि तृतीयपंथीयांमध्ये झालेल्या या राड्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.