परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील एका विद्यार्थ्याने नीट च्या परीक्षेत पास होईल का ? या विवंचनेतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील रहिवासी विनायक रामधन राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत, त्यांचा भाऊ मोहन राठोड यांचा मुलगा प्रथमेश राठोड हा इयत्ता बारावी शिक्षण घेत होता.नांदेड येथे नीटची तयारी करीत होता. चार दिवसापूर्वी तो गावाकडे आला होता.बुधवारी रात्री जेवण करून आम्ही झोपलो. व प्रथमेश राठोड हा अभ्यासासाठी त्याच्या रूममध्ये गेला. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता प्रथमेश राठोड हा उलट्या करत असल्याचा आवाज त्याच्या आईला आला.
त्याची आई प्रथमेश जवळ गेली असता विषारी औषधाचा वास आला. त्यावेळी त्याला विचारले असता त्याने मी नीट परीक्षा पास होईल का असे बोलला.आरडाओरड्याचा आवाज ऐकल्यानंतर आम्ही त्याला प्रथम उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गंगाखेड पोलिस स्टेशन येथे विनायक राठोड यांच्या तक्रारीवरून प्रथमेश याने नीटची परीक्षा पास होईल का अशी धसकी घेऊन विषारी औषध प्राशन केल्याची नोंद करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.