ठाण्यात रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

ठाण्यात रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

ठाणे , १७ जून २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर एका रिक्षाचालकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी बाहेर ही घटना घडली आहे. हा आत्मदहनाचा प्रयत्न करणार हा शिवसेनेचा असल्याची माहिती मिळत आहे. आरटिओने रिक्षा परवाना रद्द केल्याने हताश झालेल्या रिक्षाचालकाने मुख्यमंत्र्यांच्या घरी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

राज्यात अशा पद्धतीच्या अनेक घटना घडत आहेत. महिलांच्या अत्याचाराचे प्रकार वाढतच चालले आहेत. वेगवेगळ्या भागात जातीय दंगलीच्या संदर्भातील प्रकार होत आहेत. महाराष्ट्रात देखील बेरोजगारी वाढतांना दिसत आहे. त्यामुळेच असे तरूण आत्महत्याचा प्रयत्न करीत आहे. तरूणांनीच अशा पद्धतीचं पाऊल उचलल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल उपस्थित होतो, असं म्हणत अजित पवारांनी या घटनांवरून राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. विनय पांडे याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून त्यामुळेच आरटीओकडून त्याचा रिक्षा परवाना रद्द करण्यात आला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी पांडे याला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी पुढील तपास वागळे इस्टेट पोलीस करत आहेत.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसापासून घडत असलेल्या घटनांवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. त्यामुळे अशा घटनांना आता चाप बसणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version