दुर्मीळ जातीचा “धूळ नागीण” सर्प

दुर्मीळ जातीचा “धूळ नागीण” सर्प

कुपवाड येथे आढळला दुर्मीळ जातीचा “धूळ नागीण” सर्प सापडला आहे. रेस्क्यू पथकाने सर्प पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडला आहे. कुपवाड मधील कापसे प्लॉट येथे सकाळी एका घरात आढळलेला “धूळ नागीण” जातीचा साप आहे. दुर्मिळ बिनविषारी सर्प शिवेनरी सर्प रेस्कु पथकाने पकडुन वनविभागाच्या स्वाधीन केला. दिपक जाधव यांच्या घरात सर्प घुसल्याची माहिती सर्पमित्र रुद्रप्रताप कारंडे यांना फोनवरून मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारंडे यांनी शिवनेरी सर्प रेस्क्यू टीमचे पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळाची पाहणी करून तो धूळ नागिन जातीचा दुर्मिळ सर्प असल्याचे लक्षात आले. सर्पमित्रांनी त्याला कोणतीही इजा होऊ न देता सुरक्षितरीत्या पकडले. या धूळ नागिन दुर्मिळ जातीच्या सर्पास वन विभागाच्या सुपूर्द करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात क्वचित आढळणारा धूळ नागीण जातीचा बिनविषारी सर्प अतिशय चपळ आहे. इंग्रजीमध्ये त्याला “रेसर”म्हटले जाते.

बोली भाषेत चितळ्या पट्टेरी नागिन आणि चित्रांग मायकल या नावाने ओळखले जाते. या सर्पाची लांबी एक ते दीड मीटर पर्यंत असते. रंग फिकट किंवा गडद तपकिरी असतो. या दुर्मीळ सर्पास वन विभागाचे अधिकारी आणि मानद वन्यजीव रक्षक यांनी सर्पास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version