मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी : प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा पुण्यातील शो पुणे पोलिसांनी मध्येच बंद पाडला. पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी 30 एप्रिल रात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 10 वाजल्यानंतरही ए. आर. रहमान यांचा हा गाण्याचा कार्यक्रम सुरूच होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर. रहमान यांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं.
ए. आर. रहमान यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक हजर होते. प्रेक्षकांमध्ये पुणे पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी देखील कार्यक्रमाला हजर होते. मात्र हा कार्यक्रम रात्री दहा वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्यानं चक्क स्टेजवर जाऊन पुणे पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं.एवढंच नव्हे तर तुम्ही १० वाजून गेल्यांनंतरही तुम्ही हा कार्यक्रम का चालू ठेवला असा प्रश्न विचारत पुणे पोलिसांनी ए आर रहमान यांना खडेबोल सुनावले. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय.
Pune! Thank you for all the love and euphoria last night! Was such a roller coaster concert! No wonder Pune is home to so much classical music!
We shall be back soon to sing with you all again! #2BHKDinerKeyClub @heramb_shelke @btosproductions EPI pic.twitter.com/UkBn09FwLj — A.R.Rahman (@arrahman) May 1, 2023
हा व्हिडीओ पाहून ए आर रहमानच्या चाहत्यांना भरपूर राग आला असून त्यांनी समाज माध्यमांवर राग व्यक्त करताना दिसून येतायत दरम्यान, या घटनेनंतर ए आर रहमान याने कार्यक्रम थांबवण्याचा व्हिडीओ सामायिक करत म्हंटल की, कार्यक्रमाच्या मंचावर आपण सर्वांनी ‘रॉकस्टार’ या चित्रपटाचा क्षण अनुभवला होता का? मला वाटतं आम्ही ते केलं. प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आणि आणखी काही देऊ इच्छित होतो… पुणे, अशा विस्मरणीय संध्याकाळसाठी पुन्हा एकदा धन्यवाद.”रॉकस्टार या चित्रपटात जसा रणबीरचा कार्यक्रम पोलिसांनी मध्येच थांबवला तसाच आता माझाही कार्यक्रम मध्येच थांबवला त्या घटनेवेळी मला रॉकस्टार या चित्रपटाची आठवण झाली. असं म्हणत ए.आर. रहमान ने पोस्ट ट्विटर वर सामायिक केलेली पाहायला मिळतेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.