बुलढाणा सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवं वळण

बुलढाणा सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवं वळण

बुलढाणा जिल्ह्यातील राजुर घाटात तब्बल आठ जणांनी सेल्फी काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली होती. मात्र या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.

या घटनेत आ. संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी तब्बल आठ जणांवर लूटमार, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ माजली होती. बुलढाणा जिल्ह्यातील राजुर घाटात गेल्या दीड महिन्यात तब्बल सहा सामुहिक बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. तपास चक्रे फिरवत बुलढाणा पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यातही घेतलं होतं. मात्र जेव्हा या महिलेला पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा या महिलेने असं काहीच घडलं नसल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे या खळबळ माजवणाऱ्या प्रकरणातील एकंदरीत हवाच निघून गेली. हे प्रकरण नेमकं काय आहे? याकडेच सर्वांचं लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version