बांद्रा येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पालिका अधिकाऱ्यांकडून वांद्रे येथील अनधिकृत शाखेवर कारवाई करण्यात आली होती.
बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शाखेत असताना कारवाई केल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या कारवाईचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याची भेट घेण्यात आली होती. पालिका अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला भेट द्यावी, अशी मागणी वारंवार केली जात होती. पण ही भेट टाळली जात होती,असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अखेर आज शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली.
बांद्रयातील अनधिकृत शाखेवर कारवाई होताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आतमध्ये होता. बाळासाहेबांचा फोटो शाखेत असताना तोडक कारवाई केल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाने केली. मुंबई महापालिका वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन ही मागणी करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.