Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा धोका वाढला! मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

रायगड, नाशिक, पुण्यासह मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवार , दिनांक 6 जुलै 2026  रोजी सुटी जाहीर केली आहे. 
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा धोका वाढला! मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

मागील पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईला मोठा फटका बसला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये कालपासून जोरदार पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरू असून नागरिकांची तारांबळ उडालेली आहे. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी सुमुद्राला मोठी भरती येणार लाटांची उंची तब्बल 4 पूर्णांक 25 मीटर असण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यामुळे कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, पालिका आणि राज्यसरकारने नागरिकांना आवाहन केलं आहे. तर उद्या सोमवारी देखील रायगड, नाशिक, पुण्यासह सातारा घाटमाथा परिसरासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवार , दिनांक 6 जुलै 2026  रोजी सुटी जाहीर केली आहे. 

मुंबईतील सर्व विद्यालयांना सुट्टी जाहीर
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- Raigad News : मोठी बातमी! रायगडच्या दिघी किनाऱ्यावर मच्छीमारांची बोट समुद्रात उलटली

पावसाची स्थिती पाहून शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश 
पालघर जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाची स्थिती पाहून त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांचे आदेश आहेत. ज्या विभागात जास्त पाऊस असेल त्या ठिकाणी मुख्याध्यापकांनी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद
रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये उद्या बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच  अंगणवाड्याना उद्या 6 जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.  हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. या काळात जिल्ह्यात अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील ४८ तासांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून चिपळूण आणि खेड तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उद्या, सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version