दगडूशेठ गणपतीसाठी सोन्याचा पाळणा

दगडूशेठ गणपतीसाठी सोन्याचा पाळणा

माघी गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीसाठी सोन्याचा पाळणा बनवण्यात आला आहे. स्वस्तिक, ओम अशा शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात श्री गणेश जन्म सोहळा होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच बुधवार, २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी सांगितले. भक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा साकारण्यात आला आहे. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाई देखील करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पहाटे ३ पासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. बुधवारी पहाटे चार वाजता मंदिरामध्ये उस्ताद उस्मान खाँ हे सतारवादन करणार आहेत. या उत्सवासाठी मंदिरावर फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

कसा आहे पाळणा ?

पाळण्यासाठी पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टँड बनवण्यात आला आहे. यासाठी ८.५ किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. स्टँडवर १६ बाय २४ इंचाचा हा सोन्याचा पाळणा साकारला असून त्यासाठी २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version